शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

टिटागडला एक लाख जमा करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत

By admin | Updated: January 7, 2017 02:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेट्रो रेल्वे डब्बे उत्पादन निविदा प्रक्रियेत सहभागी

हायकोर्टाने फटकारले : मेट्रोच्या निविदेत सहभागी कंपनी नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेट्रो रेल्वे डब्बे उत्पादन निविदा प्रक्रियेत सहभागी टिटागड कंपनी संघाला मुख्यमंत्री दुष्काळ मदत निधीमध्ये दोन आठवड्यांत एक लाख रुपये जमा करण्याचा आदेश गेल्या २२ नोव्हेंबर रोजी दिला होता. कंपनीने या आदेशाचे अद्यापही पालन केले नाही. यामुळे न्यायालयाने शुक्रवारी कंपनीला फटकारून येत्या सोमवारपर्यंत ही रक्कम जमा करण्यास सांगितले. मेट्रो रेल्वे डब्ब्यांच्या उत्पादनाचे कंत्राट देण्यासाठी मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने २५ जानेवारी २०१६ रोजी नोटीस जारी करून निविदा आमंत्रित केल्या होत्या. हे कंत्राट मिळण्यासाठी टिटागड वॅगन कंपनी व टिटागड फायरमा अ‍ॅडलर एसपीए या कंपन्यांच्या संघासह चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन कंपनीने तांत्रिक व आर्थिक बोली सादर केली होती. दरम्यान, टिटागड कंपनी संघाने कॉर्पोरेशनला निवेदन सादर करून चायना रेल्वे कंपनी या कंत्राटासाठी अपात्र असल्याचा दावा केला. कॉर्पोरेशनने यावर काहीच निर्णय घेतला नाही.दरम्यान, कॉर्पोरेशनने चायना रेल्वे कंपनीला हे कंत्राट दिले. टिटागड कंपनी संघाने ८५२ कोटी तर, चायना रेल्वे कंपनीने ८५१ कोटी रुपयांची बोली सादर केली होती. चायना रेल्वे कंपनीला अवैधपणे कंत्राट देण्यात आल्याचा दावा करून टिटागड कंपनी संघाने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ती याचिका ५ आॅक्टोबर २०१६ रोजी फेटाळण्यात आली होती. यानंतर या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी टिटागड कंपनी संघाने दुसरी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिकाही फेटाळून कंपनीवर एक लाख रुपये ‘कॉस्टस्’ बसवला होता व ही रक्कम मुख्यमंत्री दुष्काळ मदत निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले होते. टिटागडतर्फे अ‍ॅड. अपूर्व डे तर, मेट्रोतर्फे अ‍ॅड. कौस्तुभ देवगडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)