शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:02 AM

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक अधिवेशन महिनाभर चालले : नागपुरातील नेते खूश, काहींना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.नागपूर करारांतर्गत महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर नागपुरात विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. नागपुरात साधारणत: हिवाळी अधिवेशन होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी १४ जुलै रोजी अधिवेशन सुरु होऊन ३० आॅगस्टपर्यंत चालले होते. यानंतर १९६६ मध्येही नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळी २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत अधिवेशन चालले. यानंतर १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर पर्यंत पावसाळी अधिवेशन झाले होते यानंतर मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनच होत गेले.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी नेहमीच कमी राहिला. त्यामुळे हे अधिवेशन नेहमीच विदर्भवाद्यांच्या निशाण्यावर राहिले. सरकार फक्त नावासाठी अधिवेशन घेते, आमदार, मंत्री, अधिकारी फक्त पिकनिकसाठी नागपुरात येतात, अशी टीका व्हायची. आता पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे ही तक्रार दूर होईल व किमान एक महिना कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.हिवाळी अधिवेशनाचे काय ?नागपूर करारात किमान एक अधिवेशन नागपुरात घेण्याचा उल्लेख आहे. सूत्रांच्या मते पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यावर हिवाळी घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनातच घेतला जाईल.चर्चेसाठी वेळ मिळणारपावसाळी अधिवेशन एक महिन्याचे असते. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडे चालते. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील समस्यांना प्राधान्य देण्यासाठी अधिक संधी मिळेल.आ. कृष्णा खोपडेसकारात्मक चर्चा व्हावी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे स्वागतच आहे. अधिवेशन किमान एक महिना चालावे. विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. विदर्भातील उद्योग व रोजगारावरही चर्चा व्हावी. अनिस अहमद, माजी मंत्रीशेतकऱ्यांपासून पळतेय सरकारनागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन सरकार शेतकºयांच्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न समोर येत नाही. ते मोर्चे काढू शकत नाही. आता सरकारने या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे. नितीन राऊत, माजी मंत्रीविदर्भाचा फायदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना सरकारतर्फे प्राधान्य दिले जाते. मुंबईच्या तुलनेत नागपुरात कमी पाऊस पडतो. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होणार नाही.आ. सुधाकर देशमुख

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर