शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन नवीन पूल

By admin | Updated: June 15, 2014 00:36 IST

शहरात तीन नव्या पुलांची भर पडणार आहे. त्यात झिरो माईल ते पागलखाना चौक, अमरावतीमार्गावर मारूती सेवा शोरूम ते आठवा मैल दरम्यान उड्डाण पूल, खापरी रेल्वे उड्डाण पुलाचे चौपदरीकरण आदीचा समावेश आहे.

गडकरींनी घेतला आढावा : खापरी उड्डाणपूलही चार पदरी
नागपूर : शहरात तीन नव्या पुलांची भर पडणार आहे. त्यात झिरो माईल ते पागलखाना चौक, अमरावतीमार्गावर मारूती सेवा शोरूम ते आठवा मैल दरम्यान उड्डाण पूल, खापरी रेल्वे उड्डाण पुलाचे चौपदरीकरण आदीचा समावेश आहे. तसेच झिरो माईल ते आटोमाटीव्ह चौकपर्यंत चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एमएचएआय) अधिकाऱ्यांना दिल्या.
आऊटर रिंगरोडचे ६१ किलोमीटरचे काम संथ गतीने सुरु असल्याबाबत नाराजी व्यक्त करताना गडकरी यांनी काम गतीने करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शहरातील भाजपच्या चार आमदारांसह अधिकारी या मार्गाची पाहणी करणार असून त्या नंतर यात आवश्यक बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खापरी पुलाचे चारपदरीकरून यातील एक मार्ग मनिषनगर भागाकडे वळता करण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. बुट्टीबोरी- वर्धा ते सांगली तर्यंतचा मार्ग चारपदरी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव करण्यात येणारआहे. पारडी पुलाच्या कामाला गती देण्यात येणार आहे. नागपूर - जबलपूर चारपदरी रस्त्याकरता वन विभागाकडून अडचन निर्माण करण्यात येत असल्याने गडकरींनी नाराजी व्यक्त केली व सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व त्यावरील पुलाच्या बांधकामासठी प्रस्ताव तत्काळ पाठवण्याच्या सूचना गडकरींनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील पुल व रस्त्याची कामे अधिक चांगली कशी होतील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि प्रस्तावित पुलाचे बांधकाम करताना त्याचा नव्याने आराखडा तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गडकरी यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार पुल आणि रस्त्याचे बांधकाम ‘मॉडेल’ स्वरुपात तयार केले जातील. त्यासाठी नव्याने डिझाईन तयार करताना सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल, असे महामार्ग प्राधिकरणाचे संचालक एम. चंद्रशेखर यांनी सांगितले.
बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीचे सदस्य सुधीर कुमार, मुख्य सरव्यवस्थापक एन.के. जैन, प्रकल्प संचालक एम. चंद्रशेखर उपस्थित होते. (प्रतिनिधी)