आरपीएफध्ये पुन्हा तीन जवान पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:45 IST2020-07-27T19:43:17+5:302020-07-27T19:45:28+5:30
रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे.

आरपीएफध्ये पुन्हा तीन जवान पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलात १३ आरपीएफ जवान पॉझिटिव्ह निघाल्यामुळे खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतर आता नागपूर ठाणे, गुन्हे शाखा आणि बल्लारशा येथील प्रत्येकी एक जवान पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील १२ जण बरे झाले असून चार जवानांवर उपचार सुरू आहेत. परंतु आता राखीव दल सोडून इतर विभागातील जवान पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आरपीएफ जवानांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पॉझिटिव्ह आलेल्या जवानांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर त्यांच्या संपर्कातील इतरांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
संपर्कातील जवानांची तपासणी करीत आहोत
‘रेल्वे सुरक्षा दलात आतापर्यंत १६ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. अजनी बॅरेकमधील एक खोली सील करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या जवानांपैकी १२ जण बरे झाले असून ४ जवानांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्यात येत असून गरज भासल्यास त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.’
आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे, नागपूर विभाग