शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गंभीऱ्याच्या खुनातून तिघे निर्दोष

By admin | Updated: May 1, 2016 03:02 IST

वाडीच्या रमाबाई आंबेडकरनगर येथील कुख्यात गुन्हेगार सूरज ऊर्फ गंभीऱ्या रुपचंद डोंगरे याचे अपहरण करून खून

सत्र न्यायालय : अपहरण करून केला होता खूननागपूर : वाडीच्या रमाबाई आंबेडकरनगर येथील कुख्यात गुन्हेगार सूरज ऊर्फ गंभीऱ्या रुपचंद डोंगरे याचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपातून तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. मयूर ऊर्फ एनडी कृष्णा राऊत (२२), धनानंद कृष्णा राऊत (२२) दोन्ही रा. भिवसेनखोरी आणि रितेश ऊर्फ गब्बू महेश गुप्ता (२१)रा. वडधामना, अशी आरोपींची नावे आहेत. या खटल्यात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. गजानन काळे ,अ‍ॅड. संदीप बावनगडे यांनी तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, २ मार्च २०१३ रोजी गंभीऱ्या डोंगरे याने मयूरला जबर मारहाण केली होती. या प्रकरणात गंभीऱ्याला वाडी पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसानंतर तो जामिनावर सुटून आला होता. मयूरने गंभीऱ्याचा गेम करण्याची योजना आखली होती. त्याच्या घरी जाऊन अंबाझरी भागातील मोठ्या चोरीचे आमिष दाखवून त्याला सोबत नेले होते. मयूर आणि साथीदारांनी त्याला दगडाने आणि हातबुक्क्यांनी मारून अंबाझरी तलावात बुडवले होते. त्यानंतर त्याला अंबाझरीच्याच झुडपात फेकून दिले होते. त्याचा मृतदेह २ मे २०१३ रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. वाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.