जोत्स्ना बबनसिंग क्षत्रिय (वय ७२)यांनी शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास गळफास लावून घेतला. त्या स्वामी समर्थनगरी पिपळा येथे राहत होत्या.
सर्वश्रीनगरात राहणारे संदीप किसनराव इंगळे (वय ३६) यांनी शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून घेतला. या दोन्ही प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तिसरी घटना यशोधरानगरात शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. आकाश राहुल साखरे (वय २५) याने गळफास लावून आत्महत्या केली. निशा आकाश साखरे यांच्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
औषधाच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू
नागपूर - जास्त प्रमाणात औषध गोळ्या घेतल्यामुळे शालिनी हेमराज रामटेके (वय ४५) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---