खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडासह तिघांना अटक

By योगेश पांडे | Updated: July 4, 2023 17:09 IST2023-07-04T16:53:34+5:302023-07-04T17:09:18+5:30

एका आरोपीचा शोध सुरू

Three arrested including a notorious gangster who demanded extortion | खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडासह तिघांना अटक

खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडासह तिघांना अटक

नागपूर : एका किराणा दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ईमामवाडा पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.

राजू उर्फ भिक्कू रामभाऊ परचाके (४३) असे गुंडाचे नाव असून त्याचे सहकारी सुनिल उर्फ अभिजीत अजय पाहुणे (२४) व निलेश उर्फ नाना विनोद मेश्राम (२६) यांनादेखील अटक करण्यात आली आहे. हे तिघेही रामबाग येथील मैत्री बुद्धविहाराजवळील रहिवासी आहेत. फरार असलेला त्यांचा चौथा साथीदार आशीष यादव (३२, गणेशपेठ) याच्यासोबत त्यांनी सन्नी उर्फ नबी राहुलकर या किराणा दुकानदाराला खंडणीची मागणी केली.

जर किराणा दुकान चालवायचे आहे तर दररोज २ हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर वस्तीत राहणे कठीण करून टाकू व तुला ठार मारू अशी त्यांनी धमकी दिली. त्यांनी ४ जून रोजी त्याच्याकडून सहा हजार रुपये वसूल केले. ३ जुलै रोजी ते परत दुपारी सन्नीकडे आले व पैशांची मागणी केली. त्यांनी परत धमकी दिल्यावर सन्नीने ईमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. तर आशीष यादवचा शोध सुरू आहे.

Web Title: Three arrested including a notorious gangster who demanded extortion