तोतलोडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यांना तीघांना अटक
By कमलेश वानखेडे | Updated: July 21, 2023 17:03 IST2023-07-21T17:01:33+5:302023-07-21T17:03:16+5:30
एच चप्पू बोट व एक बोरी जाळे जप्त

तोतलोडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यांना तीघांना अटक
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह धरण जलाशयात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या व्याघ्र संरक्षण दलाने अटक केली. त्यांच्याकडून एक चप्पू बोट, एक बोरी जाळे असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास व्याघ्र संरक्षण दल तोतलाडोह धरणात गस्तीसाठी बोटीने गेले असता त्यांना मध्यप्रदेशच्या सीमेलगत एका चप्पू बोटीने तीने लोक मासेमारीसाठी महाराष्ट्राच्या हद्दीत येताना दिसले. चमूने त्या बोटीचा पाठलाग केला व तीनही आरोपींनी ताब्यात घेतले सहाय्यक वनसंरक्षण अतुल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. तीनही आरोपींना २४ जुलैपर्यंत वनकोठडजी बजावण्यात आली आहे.