शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

नागपुरात एक लाखाच्या खंडणीसाठी ट्रान्सपोर्टरला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 8:40 PM

एक लाख रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या  रामबागमधील बादल राजू गजभिये (वय ३२) याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआरोपीला अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक लाख रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या  रामबागमधील बादल राजू गजभिये (वय ३२) याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.नंदू बाबारावजी पारखंडे (वय ४२) हे ट्रान्सपोर्टर आहेत. ते कुकडे लेआऊटमध्ये राहतात. त्यांचे मोक्षधाम चौकाजवळ कार्यालय आहे. आरोपी गजभिये इमामवाड्यात राहतो. त्याच्याकडे एक वाहन असून, तो ते पारखंडेच्या कार्यालयाजवळच उभे करतो. २४ जानेवारीपासून तो पारखंडे यांच्या मागे लागला आहे. तू रोज २५ हजार रुपये कमवितो. तुला महिन्याला खंडणी द्यावी लागेल, असे तो म्हणू लागला. १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता पोलीस ठाण्याजवळच्या मोक्षधाम चौकात उभे असताना आरोपी गजभिये तेथे आला. त्याने पारखंडेना शिवीगाळ करून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. न दिल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. पारखंडेंनी त्याची तक्रार गणेशपेठ ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. एएसआय भास्कर दुधकवरे यांनी आरोपी गजभियेविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीला रात्री अटक केली.दोन दिवसांची पोलीस कोठडीआरोपी बादल गजभिये हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेशपेठ पोलिसांनी त्याला शनिवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा