पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 21:29 IST2022-09-20T21:29:31+5:302022-09-20T21:29:56+5:30
Nagpur News पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी
नागपूर : पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास वैशालीनगर येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथील कार्यालयात आशिष गजभिये हे पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक व सहकाऱ्यांसह हिशेब करत होते. त्यावेळी प्रणय पाटील (३०, सुजाता नगर) हा दुचाकीने आला व बॅरिकेट सरकवून कार्यालयापर्यंत पोहोचला. त्याने कार्यालयाच्या खिडकीला जोराने आपटले व आत येऊन आशिषला शिवीगाळ करत मारहाण केली. मला पेट्रोलपंपावरून दर महिन्याला ५ हजारांची खंडणी व फुकट पेट्रोल हवे. जर असे केले नाही तर तुम्हाला जीवे मारून टाकेन, अशी त्याने धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीमध्ये २६० रुपयांचे पेट्रोल भरून घेतले व पैसे न देता तो पसार झाला. आशिषच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रणयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.