शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी

By नरेश डोंगरे | Updated: October 30, 2024 11:01 IST

सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ : अकोल्यातील आरोपीला अटक

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आरडीएक्सने स्फोट घडवून नागपूरचे रेल्वे स्थानक उडवून देण्याची एका आरोपीने धमकी दिली. यामुळे सुरक्षा यंत्रणांसह रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी धावपळ करून धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधल्या. बुद्धूराम असे त्याचे नाव असून तो अकोल्याचा रहिवासी आहे.पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एक फोन आला. आरडीएक्स पेरून नागपूरच्या रेल्वे स्थानकावर स्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी वजा माहिती फोन करणाऱ्या आरोपीने दिली.

विशेष म्हणजे, पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने दोन आठवड्यापूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या धमकीच्या फोनची सुरक्षा यंत्रणांनी गांभिर्याने दखल घेतली. लगेच रेल्वे पोलिसांना आणि रेल्वे सुरक्षा दलाला अलर्ट देण्यात आला. धमकीचा फोन ज्यावरून आला होता, त्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढण्यात आले. धमकी देणारा रेल्वे स्थानक परिसरातच असल्याचे त्यावरून लक्षात आल्याने आणखीच धाकधूक वाढली होती. दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रचंड गर्दी होती. मात्र, जीआरपीचे पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या मोबाईल धारकाला शोधून काढले. तो दारूच्या नशेत टुन्न होता. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगलीच 'सरबराई' करण्यात आली. त्याने आपले नाव बुद्धुराम सांगितले. तो अकोल्याचा मुळ निवासी आहे. नागपुरातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करतो. 

... म्हणून दिली बॉम्बस्फोटाची धमकीआरोपीची प्रदीर्घ चाैकशी करण्यात आली. त्याच्याकडे कोणतेही आक्षेपार्ह्य अथवा घातक साहित्य नव्हते. त्याच्या मोबाईलमधूनही संशयास्पद असे काही पोलिसांना मिळाले नाही. त्यामुळे त्याने बॉम्बस्फोटाची धमकी कोणत्या कारणामुळे दिली, त्याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. बराच वेळ असंबंध्द उत्तरे दिल्यानंतर त्याने धमकी मागचे कारण स्पष्ट केले. धमकी देण्यापूर्वी तो रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत दिसल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची चाैकशी केली. तो दारूच्या नशेत असून त्याच्याकडे रेल्वेचे तिकिटही नव्हते. तो विनातिकिट असल्याचे पाहून आरपीएफच्या जवानांनी त्याला फलाटावरून हाकलून लावले. तो अपमाण त्याच्या जिव्हारी लागला. त्याचमुळे त्याने ११२ क्रमांकावर फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे सांगितले. त्याच्या या कृत्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. 

टॅग्स :nagpurनागपूर