खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, अन्यथा...; नागपुरातील बस स्टॉपवरील मजकुरानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:16 IST2019-07-08T11:12:48+5:302019-07-08T11:16:33+5:30
शहरातील महत्त्वाच्या बस स्टॉपवर धमकी देणारी पत्रकं

खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, अन्यथा...; नागपुरातील बस स्टॉपवरील मजकुरानं खळबळ
नागपूर: शहरातील बस स्टॉपवर आक्षेपार्ह मजकूर असणारे कागद चिकटवण्यात आले आहेत. यामधून भारत सरकार आणि कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा, असा थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या बस स्टॉप्सवर हा धमकी देणारा मजकूर लावण्यात आला आहे.
खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या. ही धमकी गांभीर्यानं घ्या. अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पाठवू, असा मजकूर बस स्टॉपवर चिटकवण्यात आलेल्या पत्रकावर आहे. आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत, असा उल्लेखदेखील पत्रकात आहे. सकाळच्या सुमारास हे पत्रक अनेकांच्या निदर्शनास आलं. मात्र सुरुवातीच्या तासाभरात पोलीस या ठिकाणी फिरकलेसुद्धा नाहीत. या पत्रकांमागे नेमकी कोणती संघटना, पक्ष आहे, याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे.