"ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात"

By कमलेश वानखेडे | Published: August 10, 2023 05:02 PM2023-08-10T17:02:26+5:302023-08-10T17:04:18+5:30

सुधीर मुनगंटीवार यांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर टीका

Those without support dream of mid-term elections, sudhir mungantiwar slams prakash ambedkar | "ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात"

"ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात"

googlenewsNext

नागपूर : देशाच्या निवडणुका होतील, विधानसभा निवडणुका लागतील, असे अनेक जण स्वप्नरंजन करत असतात. ज्यांना लोकांचा पाठिंबा कमी असतो ते असे दिवसाढवळ्या मध्यावधी निवडणुकांचे स्वप्न पाहतात, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर केली.

मुनगंटीवार म्हणाले, विधानसभा लोकसभा मध्ये काही परंपरा प्रथा आहेत, ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभेत पान खाऊ शकत नाही त्याप्रमाणे सभागृहात आशिष्ट पद्धतीने हात वारे करणे हे प्रथा परंपरेमध्ये गैर मानले गेले आहे. नीच-निम्न शब्दाचा उपयोग हे चालत नाही. राहुल गांधी यांची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्षच मदत वाटते, असं तोच नेता करू शकतो ज्याच्या ओठांमध्ये एक आहे आणि पोटात मोदीजी निवडून यावे असा भाव आहे, असा टोला त्यांनी लगावला. कलावती म्हणजे केवळ कलावती नाही तर कलावती सारख्या ज्या लाखो गरीब गरजू महिला आहेत, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुटलीच नाही. तेव्हाच्या कालावधीतील बातम्या बघितल्या तर उद्धव ठाकरेंनी ही भूमिका निश्चितच केली होती की आपल्याला युतीमध्ये जायचे नाही, हे स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Those without support dream of mid-term elections, sudhir mungantiwar slams prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.