यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:17 IST2024-12-16T08:16:08+5:302024-12-16T08:17:22+5:30
एवढेच नव्हे, तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले.

यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मर्यादित मंत्रिपदामुळे योग्यता असूनही एकाच वेळी अनेकांना संधी मिळत नाही. मात्र, डोन्ट वरी, यावेळी मंत्रिपदाचा कार्यकाळ पाच वर्षे ऐवजी अडीच वर्षांचा केला आहे. त्यामुळे अनेकांना संधी मिळेल. एवढेच नव्हे, तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार गटाने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.