शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नागपूर रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरास ३३ मिनिटांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:45 AM

पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली. आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.रविवारी सकाळी १०.०३ वाजता आरपीएफचा जवान विकास शर्मा यास एक प्रवासी फिरताना आढळला. त्याने आपले नाव दीपक रामभाऊ शाह (२९) रा. समस्तीपूर, बिहार सांगितले. दोन दिवसांपूर्वी विकत घेतलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल पॅसेंजर लाऊंजमध्ये चाजर््िगिंला लावला असताना अज्ञात आरोपीने चोरी केल्याची माहिती त्याने दिली. त्यावर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्हीत संशयित आरोपीजवळ आला. त्याने आपल्याजवळील तुटका फुटका मोबाईल काही काळ चार्जिंगवर लावला. कुणाचेच लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने आपला खराब मोबाईल तेथेच ठेवून प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळ काढला. आरोपीबाबत ड्युटीवरील जवान विकास शर्मा, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे यांना कळविण्यात आले. आरोपी १०.३६ वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर स्लिपरक्लास वेटिंग हॉलच्या बाजूला आढळला. लगेच त्यास अटक करून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर केले. त्याने आपले नाव प्रकाश मनोहर खांडेकर (५६) रा. जरीपटका सांगितले. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी