शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

यापुढे फेसबुकवर फोटो टाकताना थोडा विचार करा : वक्त्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 11:37 PM

फेसबुकवर आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी शक्यतो सांगू नयेत, ऑनलाईन शॉपिंग करताना कोणते नियम पाळावेत किंवा इन्स्टाग्रामवर कोणते फोटो टाकू नयेत याचे अवधान स्त्रियांनी कसे राखावे

ठळक मुद्देसायबर सेफ्टी ही प्रत्येकाचीच जबाबदारीसायबर सेफ्टी विमेन या विषयावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवर आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी शक्यतो सांगू नयेत, ऑनलाईन शॉपिंग करताना कोणते नियम पाळावेत किंवा इन्स्टाग्रामवर कोणते फोटो टाकू नयेत याचे अवधान स्त्रियांनी कसे राखावे, याबाबत उद्बोधन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर पोलीस सायबर सेल तसेच महिला व बालकल्याण विभागाातर्फे शुक्रवारी करण्यात आले होते.‘सायबर सेफ वुमन’ या शीर्षकांतर्गत आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार, सायबर तज्ज्ञ महेश माखिजा, वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक, अ‍ॅड. अंजली विटणकर, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, सायबर व विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर वक्ते म्हणून सहभागी झाले होते.सायबर क्राईमचा अलिकडचा वाढता आलेख पाहता, याबाबत नागरिकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज यात विशद करण्यात आली. सायबर सेफ्टी किंवा सायबर क्राईम यासंदर्भात, प्रश्न हा नेमका कुठे आहे हे शोधणे गरजेचे असल्याचे मत हेमराज बागूल यांनी व्यक्त केले. आपण मुलामुलींच्या संगोपनात भेदभाव करतो. या प्रश्नाचे मूळ तिथेच रुजले जाते. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज अधिक आहे. आता बदलण्याची गरज मुलींना नाही तर मुलांना आहे. दुसरे म्हणजे आपल्या संस्थात्मक रचनांमध्येही याबाबत योग्य ते बदल घडून येण्याची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले.महाराष्ट्र राज्य महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. नागपुरात रात्री दहानंतर एकटीने घरी जाणाऱ्या स्त्रियांसाठी सुरू करण्यात आलेल्या होम ड्रॉप सोयीचा लाभ दररोज कित्येक स्त्रिया घेत असल्याचे ते पुढे म्हणाले.सायबर सेफ्टी ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. मुलींनीही आपली जबाबदारी जाणून घ्यावी व सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना काळजी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपले शिक्षण तंत्रही बदलले आहे. त्याचे साईड इफेक्ट जाणवतात ते तंत्रज्ञानातील दोषामुळे नव्हे तर आपण त्याचा सदोष वापर करतो त्यामुळे, असे मत सुरेंद्र जिचकार यांनी मांडले. व्हॉटसअ‍ॅप किंवा फेसबुक ही संवादाकरिता निर्माण केलेली माध्यमे आहेत. मात्र आपण त्यांचा वापर सोशल मीडियासारखा करत आहोत. त्यामुळे आपण आपली व्यक्तिगत स्वायत्तता जपली पाहिजे. तुम्ही कुठे आहात, काय करत आहात, ते जाणण्याचा अधिकार तुम्ही इतरांना देता कामा नये, असेही त्यांनी पुढे म्हटले.आपण कायमस्वरुपी सायबर सेफ राहू शकत नाही, असे परखड मत सरिता कौशिक यांनी मांडले. आजच्या सायबरच्या वेगवान युगात ते शक्य नाही. मात्र सोशल मीडिया असो, आॅनलाईन शॉपिंग असो वा अन्य बाबी, आपण आपली सुरक्षितता जास्तीतजास्त कशी राखू शकतो यावर अधिक भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण आपले सायबर फूट प्रिंट या जगात किती सोडायचे याचे भान राखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सायबर तज्ज्ञ महेश माखिजा यांनी विविध अ‍ॅप्स वापरताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. संचालन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी केले.

 

टॅग्स :FacebookफेसबुकWomenमहिला