चोरट्यांनी घर फोडत चांदीचा प्याला, वाटी, दिवा, चौरंग पळविले
By योगेश पांडे | Updated: July 12, 2023 12:39 IST2023-07-12T12:38:59+5:302023-07-12T12:39:48+5:30
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद

चोरट्यांनी घर फोडत चांदीचा प्याला, वाटी, दिवा, चौरंग पळविले
नागपूर : घरातील सर्व सदस्य उज्जैन येथे गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत चांदीचे प्याले, वाटी, दिवा व चौरंगासारखे साहित्य लंपास केले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुंदरलाल घनश्याम यादव (४८, धम्मानंद नगर, पिवळी नदी) हे आपल्या कुटुंबियांसह ९ जुलै रोजी कुलूप लावून उज्जैनला गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील चांदीचे पुजेचे साहित्य पळविले. त्यात चांदीचे ताट, वाटी, चमचे, प्याला, दिवा, पानसुपारी प्लेट, चौरंग, लोटा, सिक्के व दागिने यांचा समावेश होता. सोबतच चोरांनी रोख ५२ हजारांच्या रकमेवरदेखील डल्ला मारला. यादव घरी परत आल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.