नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरूच, देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी

By योगेश पांडे | Updated: August 8, 2023 11:53 IST2023-08-08T11:51:59+5:302023-08-08T11:53:20+5:30

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Thieves looted goods worth 1.89 lakhs by breaking into the house of a family who had gone out of the village | नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरूच, देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी

नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरूच, देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी

नागपूर : देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी करत चोरट्यांनी १.८९ लाखांचा माल लंपास केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिलींद रमेश सावरकर (२५, तुकाराम नगर, कळमना) हे ६ ऑगस्ट रोजी घरातील सर्व सदस्यांसह कुलूप लावून देवदर्शनासाठी आष्टी येथे गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील कुलूप तोडून आत प्रवेश काल व बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिने व रोख साडेआठ हजार रुपये असा १.८९ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घरी परत आल्यावर हा प्रकार सावरकर यांना दिसला. त्यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून दररोज शहरातील विविध भागांत घरफोडीच्या घटना होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांवर वचक असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात चोरट्यांचा हैदोस सुरूच असल्याचे चित्र आहे.

Web Title: Thieves looted goods worth 1.89 lakhs by breaking into the house of a family who had gone out of the village