चोरट्यांकडून ब्युटीपार्लर ‘टार्गेट’, ८.९३ लाखांचा मुद्देमाल लंपास

By योगेश पांडे | Updated: July 18, 2023 16:26 IST2023-07-18T16:26:07+5:302023-07-18T16:26:42+5:30

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद

Thieves loot beauty parlour 'Target', worth 8.93 lakh stolen | चोरट्यांकडून ब्युटीपार्लर ‘टार्गेट’, ८.९३ लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यांकडून ब्युटीपार्लर ‘टार्गेट’, ८.९३ लाखांचा मुद्देमाल लंपास

नागपूर : एरवी चोरट्यांकडून रेकी केल्यानंतर बंद घरे फोडण्यात येतात. मात्र पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क ब्युटीपार्लर फोडून तेथून तब्बल ८.९३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

पौर्णिमा मेशक चक्रनारायण (मोहननगर) यांचे मोतीबाग नोगा फॅक्टरीजवळ ब्युटी ॲंड बियॉंड नावाचे ब्युटी पार्लर आहे. १६ जुलै रोजी दुपारी तीन वाजता त्यांना बाहेरील ऑर्डर होता. त्यामुळे त्या ते काम करायला ब्युटीपार्लरला कुलूप लावून गेल्या व त्यानंतर तेथून सासुरवाडील्या गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ब्युटीपार्लर उघडायला आल्या असता तेथील दरवाजा उघडाच होता.

अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाच्या दाराची कडी आतून काढून प्रवेश करत पौर्णिमा व त्यांच्या आईच्या बॅगमधील तसेच कपाटातील सोन्याचे दागिने व रोख ४ लाख रुपये असा एकूण ८.९३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. पौर्णिमा यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Thieves loot beauty parlour 'Target', worth 8.93 lakh stolen