पहाटे दरवाजा उघडा ठेवून बाहेर पडला, चोरट्यांनी लॅपटॉप लांबविले
By योगेश पांडे | Updated: April 24, 2023 17:26 IST2023-04-24T17:26:00+5:302023-04-24T17:26:52+5:30
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पहाटे दरवाजा उघडा ठेवून बाहेर पडला, चोरट्यांनी लॅपटॉप लांबविले
नागपूर : पहाटेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेल जाणे एका विद्यार्थ्याला चांगलेच भोवले. चोरट्यांनी त्याच्यासह त्याच्या मित्रांचे लॅपटॉप व मोबाईलच लांबविले. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रुपल योगेश अकर्ते (२१) हा भाऊसाहेब सुर्वे नगर येथील श्रीरायम अपार्टमेंट्समध्ये मित्रांसह भाड्याने राहतो. तो शिक्षण घेत आहे. रात्री सर्व मित्र झोपी गेले व पहाटेच्या सुमारास रुपलचा रूममेट अशफाक हा घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेला. त्यानंतर अज्ञात चोरट्याने संधी साधली व फ्लॅटमध्ये शिरून चार लॅपटॉप, तीन मोबाईल, रोख साडेतीन हजार रुपये असा १ लाख ३ हजारांचा ऐवज चोरून नेला. झोपून उठल्यावर विद्यार्थ्यांना ही बाब कळाली. लॅपटॉप व मोबाईलमध्ये अभ्यासाशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स व नोट्स होते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. रूपलच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.