भाऊबीजेसाठी मेहुण्याकडे गेले अन् चोरट्यांनी घर फोडले

By योगेश पांडे | Updated: November 22, 2023 13:19 IST2023-11-22T13:16:37+5:302023-11-22T13:19:30+5:30

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

thieves broke into the locked house and theft worth 2 lakhs of things | भाऊबीजेसाठी मेहुण्याकडे गेले अन् चोरट्यांनी घर फोडले

भाऊबीजेसाठी मेहुण्याकडे गेले अन् चोरट्यांनी घर फोडले

नागपूर : दिवाळी आटोपल्यानंतर मेहुण्याकडे भाऊबीजेसाठी जाणे एका कुटुंबाला महागात पडले. चोरट्यांनी कुणीच नसल्याची संधी साधत घर फोडून दोन लाखांहून अधिकचा ऐवज चोरून नेला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राजेंद्र माधवराव कुंभारे (४५,न्यू ओमनगर, हुडकेश्वर मार्ग) हे त्यांच्या कुटुंबियांसह पत्नीच्या भावाकडे सोमवारी भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेले. जुनी मंगळवारी येथे गेल्यानंतर रात्री त्यांनी तेथेच मुक्काम केला. घरी कुणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील दागिने व रोख एक लाख रुपये असा २.१८ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुसऱ्या दिवशी घरी परत आल्यावर हा प्रकार कुंभारे यांच्या लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: thieves broke into the locked house and theft worth 2 lakhs of things