शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दलालांना बाहेरच ठेवणार

By admin | Updated: January 31, 2015 02:17 IST

परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानुसार दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्यासाठी शुक्रवारपासून....

नागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानुसार दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्यासाठी शुक्रवारपासून तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच प्रत्येकाला अडवून त्यांच्या कामाची चौकशी करूनच ते आत सोडतील,अशी माहिती शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांनी पत्रकारांना दिली.दलालांना प्रवेशबंदी करण्याच्या महाराष्ट्र परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या १२ जानेवारीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर परिवहन सचिव आणि अकोला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवरील प्रारंभिक सुनावणीनंतर न्यायालयाने ट्रक असोसिएशनच्या प्राधिकृत प्रतिनिधींना आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचे निर्देश अकोला परिवहन अधिकाऱ्यांना दिले आणि प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. परंतु हे अकोला आरटीओपुरतेच मर्यादित असल्याने नागपूर शहर आरटीओ कार्यालयात दलालांना प्रवेश बंदी कायम असणार आहे. शेळके म्हणाले, कार्यालयात येणाऱ्यांसाठी नाल्याकाठावरील जागेवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या शिवाय उद्या शुक्रवारपासून एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असून दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर निरीक्षक उभे राहतील. पत्रपरिषदेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण व पूर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपस्थित होते. (प्रतिनिधी)