शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन’साठी शिक्षण मंत्रालयात राहणार विशेष विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 07:00 IST

शिक्षण मंत्रालयात ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. या माध्यमातून ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलानुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलण्यात येतील.

ठळक मुद्देदेशातील ‘डिजिटल डिव्हाईड’ दूर करण्यावर भर‘व्हर्च्युअल लॅब’ विकसित करणार

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘ऑनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असून या प्रणालीचे भविष्यातील महत्त्व सर्वांनाच लक्षात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणातदेखील ‘डिजिटल’ माध्यमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयात ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. या माध्यमातून ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलानुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलण्यात येतील.तंत्रज्ञान सातत्याने बदलताना दिसून येत असून दर सहा महिन्यात नवीन उपकरणे व तंत्र समोर येत आहे. अशा स्थितीत या विशेष विभागामार्फत त्यानुसार ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणालीतदेखील आवश्यक बदल करण्यात येईल. शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील विद्यार्थी व शिक्षकांची गरज लक्षात घेऊन ‘डिजिटल कंटेंट’ विकसित करण्यात येईल. या विभागात केवळ शिक्षणतज्ज्ञच नाही तर प्रशासकीय, तंत्रज्ञान, ‘ई-गव्हर्नन्स’ इत्यादी क्षेत्रातील लोकांचादेखील समावेश राहणार आहे. शिवाय देशपातळीवर ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येईल.जनसंवाद माध्यमातून २४ बाय ७ धडेदेशात लोकसंख्येचा मोठा टक्का आजदेखील ‘ऑनलाईन’ माध्यमांपासून दूर आहे. हे अंतर दूर करण्यासाठी व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी या धोरणानुसार विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. याअंतर्गत दूरचित्रवाणी, रेडिओ, ‘कम्युनिटी रेडिओ’ या जनसंवाद माध्यमातून वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना धडे देण्यात येतील. देशातील विविध भाषांमध्ये २४ बाय ७ हे शिक्षण पुरविण्याची सोय करण्यात येणार आहे.‘अ‍ॅप’, ‘गेम्स’देखील विकसित करणारहसतखेळत व प्रात्यक्षिक आधारित ‘ऑनलाईन’ शिक्षण व्हावे यासाठी देशपातळीवर ‘डिजिटल’ संग्रह तयार करण्यात येणार आहे. यात ‘कोर्सवर्क’ची निर्मिती, ‘लर्निंग गेम्स’, ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ इत्यादींचा समावेश असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध विषय तसेच भारतीय कला-संस्कृती सहजतेने कळावी यासाठी ‘गेम’आधारित ‘अ‍ॅप’देखील विकसित करण्यात येतील.यावर राहणार मंत्रालयाचा भर-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘पायलट स्टडी’ राबविणार-देशाची लोकसंख्या लक्षात घेता ‘डिजिटल’ पायाभूत सुविधांच्या विकासावर भर-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी नवीन ‘प्लॅटफॉर्म’ विकसित करणार-‘दीक्षा’, ‘स्वयम्’ इत्यादींच्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करणार-शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी सुविधा-‘ऑनलाईन’ परीक्षा व मूल्यमापनाचा आराखडा ठरविणार-पारंपरिक व ‘डिजिटल’ शिक्षणप्रणालीची सांगड घालणारे ‘मॉडेल’ तयार करणार-‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी मापदंड निश्चित करणार.