शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात चार प्रांतांऐवजी संघाचे होणार सात विभाग; विदर्भात वर्षभरात वाढल्या २१ टक्के शाखा

By योगेश पांडे | Updated: March 24, 2026 20:26 IST

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत. यानुसार महाराष्ट्रात आता चार प्रातांऐवजी सात विभागांत कामाचे विभाजन होणार आहे. पुढील वर्षभरात नेमकी रचना निश्चित करून ती बदलविण्यात येणार आहे. सोबतच पुढील वर्षभर देशभरात संघशाखांच्या वाढीवरदेखील भर देण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.

समालखा येथे झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेबाबत त्यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे, महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे, महानगर प्रचारप्रमुख ब्रजेश मानस उपस्थित होते. सद्यस्थितीत पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्र-गुजरात-गोवा या राज्यांचा समावेश होतो व त्यात एकूण सहा प्रांत आहेत. मात्र नवीन रचनेनुसार गुजरातमध्ये तीन विभाग असतील तर महाराष्ट्रात एकूण सात विभाग असतील. मुंबई अगोदर कोकण प्रांताचा भाग होता. मात्र आता मुंबई वेगळा विभाग असेल. सोबतच कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी, पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भ असे महाराष्ट्रात एकूण सात विभाग असतील, असे तामशेट्टीवार यांनी स्पष्ट केले. देशभरात सद्यस्थितीत ४६ प्रांत आहेत. नवीन रचनेनंतर एकूण विभागांची संख्या ८६ इतकी होईल, असे त्यांनी सांगितले.

विदर्भातील शाखांची संख्या अडीच हजारांवर

विदर्बात २०२५ साली १ हजार १७७ स्थानांवर संघाच्या २ हजार ५८ शाखा होत्या. वर्षभरात त्यात २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली व आता २ हजार ५०२ शाखा लागत आहेत. याशिवाय साप्ताहिक मिलनाची संख्या ३४१ वरून ३७२ इतकी झाली आहे.

विदर्भात २९ लाख घरांशी संपर्क

संघाकडून शताब्दी वर्षांत व्यापक गृहसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.आतापर्यंत साडेबारा हजार गावांतील २९.७४ लाख घरांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला आहे. तसेच विदर्भात ८२६ ठिकाणी हिंदू संमेलने झाली आहेत, अशी माहिती तामशेट्टीवार यांनी दिली.

तरुणांशी संपर्क वाढविणार

शताब्दी वर्षात संघाकडून सात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची निश्चिती करण्यात आली होती. याअंतर्गतच तरुणांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सोबतच सोशल माध्यमांमध्ये सक्रियतादेखील वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तामशेट्टीवार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : RSS to Reorganize Maharashtra into Seven Divisions; Vidarbha Sees Growth.

Web Summary : RSS will reorganize Maharashtra into seven divisions instead of four. Vidarbha witnessed a 21% increase in RSS branches this year. The organization is focusing on expansion and youth engagement, reaching millions of homes.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूरVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र