There will be regular encroachment on 16,000 in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील १६ हजारावर अतिक्रमण होणार नियमित

नागपूर जिल्ह्यातील १६ हजारावर अतिक्रमण होणार नियमित

ठळक मुद्देस्वामित्व योजनेंतर्गत मिळणार घरांचे प्रापर्टी कार्ड : ५७ गावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील गावठाणातील व इतर शासकीय जमिनीवर करण्यात आलेले ग्रामीण भागातील १६ हजारावर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणार आहे. त्यापैकी शासकीय जमिनीवर असलेल्या १२ हजारांवर अतिक्रमित जागांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर स्वामित्व योजनेंतर्गत ८ तालुक्यातील ५७ गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या घराचे प्रापर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत बहुतांशी गावात सरकारी जागांवर अतिक्रमण असून, याची कारणेही स्थानपरत्वे वेगवेगळी आहेत. अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना शासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ हजारांवर घरांना मालकी हक्क मिळणार आहे. शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या आवास योजनेचा लाभ अतिक्रमणधारकांना घेता येत नव्हता. स्वमालकीची जागा नसल्याने ते लाभापासून वंचित होते. गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी व वनक्षेत्र तसेच ज्या ठिकाणी वास्तव्य शक्य नाही अशा जागा वगळून इतर शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमण नियमित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रा.पं.अंतर्गत येणाºया जवळपास ३,३७१ अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. तर शासकीय जागांवरील तब्बल १२ हजारावरील असे एकूण १६ हजारांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येणार आहेत. ५०० चौ. फूट ते २००० चौ. फुटाचे अतिक्रमण नियमित होणार आहे. गावठाणील ३,३७१ पैकी ४१९ प्रकरणांवर सीईओंनी निर्णय दिला आहे. म्हणजेच त्या नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यापैकी ३४२ कुटुंबीयांचे ५०० चौ. फुटाहून अधिकचे अतिक्रमण असल्याने त्यांना शासकीय दराप्रमाणे त्याचे शुल्क भरावे लागणार आहे. तर यापूर्वी २०० वर लोकांना प्रॉपर्टी कार्डचेही वाटपही करण्यात आले आहे. तर आता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या २ आॅक्टोबरला स्वामित्व योजनेंतर्गत आणखी ८ तालुक्यातील ५७ गावांमधील हजारो नागरिकांना या प्रापर्टी कार्डाचे वितरण करून त्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होणार आहे.

ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून झाली मोजणी
महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक गावातील गावठाणांतील जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरुवातीला मोजणी करण्यात आली. नंतर आणखी गावांचा यात समावेश करून त्यांचीही मोजणी करण्यात आली.
 तालुकानिहाय गाव -हिंगणा ६कळमेश्वर ६उमरेड १९भिवापूर ३कामठी ४नागपूर (ग्रा.) १०पारशिवनी २सावनेर २

Web Title: There will be regular encroachment on 16,000 in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.