शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनचे शुल्क आहे, पण सेवा नाही

By admin | Updated: May 28, 2014 01:01 IST

महापालिकेच्या अग्निशमन विभागाची अँम्बुलन्स गरज पडल्यास कधीच मिळत नाही, शववाहिनी देखील बंद पडली आहे. ती ही कामी येत नाही. असे असले तरी महापालिका या दोन्ही

राजीव सिंह - नागपूर

महापालिकेच्या अग्निशमन विभागाची अँम्बुलन्स गरज पडल्यास कधीच मिळत नाही, शववाहिनी देखील बंद पडली आहे. ती ही कामी येत नाही. असे असले तरी महापालिका या दोन्ही सेवांच्या शुल्कात वाढ करताना या बाबींचा विचार करीत नाही. या सेवा सुरू ठेवण्यात महापालिका अपयशी ठरली असताना या सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय मात्र महापालिकेने घेतला आहे.

दहा वर्षांंपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन केला तर अँम्बुलन्स सेवा उपलब्ध व्हायची. मृतदेह दहन घाटावर नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध व्हायची. आता मात्र अशी सुविधा नाही. सध्या अग्निशमन विभागाला फोन करून या सेवांची मागणी केली तर तेथे उपस्थित कर्मचारी सध्या या सेवा उपलब्ध नसल्याचे सांगतो. पूर्वी महापालिकेकडे दोन अँम्बुलन्स व दोन शववाहिका होत्या. देखभाल दुरुस्तीअभावी अँम्बुलन्स व शववाहिका बंद पडल्या. असे असतानाही तत्कालीन आयुक्त संजीव जायस्वाल यांनी ३0 नोव्हेंबर २0११ रोजी अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन सेवा शुल्कात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही वाढ केली. अडीच वर्षानंतर संबंधित वाढीव दरांना मंजुरी घेण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आली. आश्‍चर्याची बाब म्हणजे स्थायी समितीच्या एकाही सदस्याने अग्निशमन सेवांबाबत विचारले नाही व शुल्कवाढीचा विरोधही केला नाही. नव्या प्रस्तावानुसार अँम्बुलन्स सेवा शहरात मोफत आहे.

मात्र शहराबाहेर नेण्यासाठी प्रति किमी १0 रुपयेप्रमाणे भाडे द्यावे लागते. पूर्वी हा दर ७ रुपये होता. रात्रीच्या मुक्कामाचा चार्ज ५0 रुपये प्रति तास प्रमाणे निश्‍चित करण्यात आला आहे. शववाहिका देखील शहरात निशु:ल्क आहे. मात्र शहराबाहेर नेण्यासाठी शुल्क द्यावे लागेल.

महापालिकेला विहिरींची स्वच्छता करण्यासाठी दोन नव्या जीप खरेदी करायच्या आहेत. याची पूर्ण प्रक्रिया झाली आहे. जीप मिळणे बाकी आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून शोरूममधून अग्निशमन विभागापर्यंंत पोहचलेली नाही.