महिला मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेली, चोरट्यांनी घर साफ केले

By योगेश पांडे | Updated: October 5, 2023 14:12 IST2023-10-05T14:01:18+5:302023-10-05T14:12:27+5:30

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

The woman went to fetch the child from school, the thieves cleaned the house | महिला मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेली, चोरट्यांनी घर साफ केले

महिला मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेली, चोरट्यांनी घर साफ केले

नागपूर : एक महिला मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेली असता चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केला.वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शीला राजेंद्र कुंभलवार (३०, गजानन नगर, लोखंडी कुटी जवळ, वाठोडा)  या बुधवारी साडेचार वाजताच्या सुमारास घराला कुलुप लावून मुलाला शाळेतुन आणण्यासाठी गेल्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील आलमारीतील रोख दीड लाख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३.३९ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. शीला यांना घरी आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman went to fetch the child from school, the thieves cleaned the house