हायकोर्टात पोहोचली बडनेऱ्यातील उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती; दाखल केली जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:54 IST2026-03-05T12:52:38+5:302026-03-05T12:54:06+5:30
Nagpur : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुना बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती उच्च न्यायालयात पोहचली आहे.

The slow pace of construction of the flyover in Badnera reached the High Court; Public Interest Litigation filed
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुना बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती उच्च न्यायालयात पोहचली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने 'लोकमत'च्या बातमीची दखल घेऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे.
ही बातमी १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून बांधण्यात येत असलेला हा उड्डाणपूल तब्बल सहा वर्षांपासून पूर्ण झाला नाही. उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्याचा वाईट परिणाम शहराच्या वाहतुकीवर पदत आहे नागरिकांना वाइतक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल असून त्याच्या प्रस्तावाला २०२० मध्ये मंजुरी मिळाली होती, पण प्रत्यक्ष कामाला २०२१ मध्ये सरुवात झाली उडाणपुलासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, निधी वाटपातील अनियमिततेमुळे उड्डाणपुलाच्या कामाने कधीच गती पकडली नाही. अंतिम टप्प्यातील कामही संथगतीने सरू आहे.
महारेलकडे जबाबदारी
उड्डाणपुलाची जबाबदारी महारेलकडे आहे. काम ढिसाळ पद्धतीने सुरू असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. दोन खासदारांच्या कार्यकाळात तयार होत असलेल्या आणि तरीही अर्धवट असलेल्या या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पूर्णत्वास न्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
वेगवेगळी कारणे देतात
सुरुवातीला फ्लाय अॅश मिळत नसल्यामुळे काम रखडल्याचे सांगण्यात येत होते. आता आवश्यक निधी मिळत नसल्याचे कारण दिले जात आहे. उड्डाणपुलाच्या उतारात भरण्यासाठी १०० डम्पर फ्लाय अॅश लागणार आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.
अॅड. सुमित गंधे न्यायालयमित्र
या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. सुमित गंधे यांची न्यायालयमित्र म्हणून नियुक्ती केली व त्यांना येत्या १८ मार्चपर्यंत नियमानुसार याचिका दाखल करण्यास सांगितले.