शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुर शिक्षण विभागात घोटाळ्यांचे सत्र थांबेना ! १२ शाळांनी लाटले कोट्यवधी रुपयांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:11 IST

Nagpur : हजारो कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा अद्याप सोक्षमोक्ष लागला नसताना शासनाच्या डोळ्यांत धूळ फेकत नागपूर जिल्ह्यातील १२ शाळांनी कोट्यवधी रुपयांचे शासकीय अनुदान लाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हजारो कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा अद्याप सोक्षमोक्ष लागला नसताना शासनाच्या डोळ्यांत धूळ फेकत नागपूर जिल्ह्यातील १२ शाळांनी कोट्यवधी रुपयांचे शासकीय अनुदान लाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील या १२ शाळांचे शिक्षक, पदाधिकारी, तसेच या अपहारास जबाबदार असलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना दिले आहेत.

याबाबत आरटीआय कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी २०१७ साली शिक्षण उपसंचालक, आयुक्त, शिक्षण शिक्षणमंत्री व पोलिस विभागालाही तक्रार केली होती. आरटीआयअंतर्गत मागितलेल्या माहितीत या शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या माहितीनुसार या शाळांनी २०१३ साली शाळा व शाळेतील तुकड्यांसाठी अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेत नागपूर जिल्ह्यातील १२ शाळांना २०१४ साली २० टक्के टप्पा वाढ अनुदानास पात्र ठरविले होते. मात्र, अनुदान वितरणाचे कुठलेही आदेश दिले नव्हते. पुढे १ फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयानुसार सप्टेंबर २०१६ पासून या शाळांना टप्पा वाढीनुसार अनुदान वितरित करण्याबाबत सूचना केली होती. मात्र, या शाळांना २०१४ पासूनच अनुदान वितरित करण्यात आले होते. 

अधिकारीही रडारवर

या आर्थिक फसवणूक प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना उपसचिवांच्या आदेशात आहेत. यामध्ये २०१३ पासून ते २०१७ पर्यंतचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वेतन प्रथम अधीक्षक, तसेच काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

शिक्षणमंत्र्यांनी आधीही दिले होते निर्देश

या प्रकरणात गुप्ता यांच्या तक्रारीनंतर तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेत १४ मे २०१८ रोजी या प्रकरणात मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती.त्यानंतर १८ मे रोजी या प्रकरणात समाविष्ट १२ शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्याही चौकशीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावरही कारवाई झाली नाही.पुढे हे प्रकरण न्यायालयात 3 दाखल करण्यात आले. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत या शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू आहे.

या शाळांचा आहे समावेश

  1. भवानी माता उच्च प्रा. शाळा, भरतवाडा.
  2. एन.एस. व्ही. एम. फुलवारी प्रा. शाळा मराठी, वैशालीनगर.
  3. एन.एस. व्ही. एम. फुलवारी प्रा. शाळा हिंदी, वैशालीनगर.
  4. संत गीतामाता प्राथमिक शाळा, भरतवाडा.
  5. माँ भवानी हिंदी प्रा. शाळा.
  6. स्व. श्यामरावजी देशमुख प्रा. शाळा, हिंगणा.
  7. कश्मीर विद्या मंदिर, विनोबा भावेनगर.
  8. गुरुप्रसाद प्रा. शाळा, वाडी.
  9. शांतिनिकेतन प्रा. शाळा, राजीवनगर.
  10. अमित उच्च प्रा. शाळा, नरसाळा.
  11. श्रीमती भगवती देवी चौधरी, सोनेगाव.
  12. गजानन उच्च प्राथमिक शाळा, सर्वश्रीनगर.
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Education Department Scam: Crores Embezzled by 12 Schools

Web Summary : A massive scam in Nagpur's education sector has surfaced, revealing that 12 schools embezzled crores in government grants. An RTI inquiry exposed the fraud, prompting orders for filing cases against involved officials and school staff. Investigations are ongoing since 2017, yet salaries continue to be paid.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूरEducationशिक्षण