सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By योगेश पांडे | Updated: May 31, 2023 17:00 IST2023-05-31T16:59:29+5:302023-05-31T17:00:10+5:30
सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नागपूर : शहरातील एका शोरूममधील सेल्समनने खरेदीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गजानन बबनराव दांडेकर (३३, सेमिनरी हिल्स) असे आरोपीचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे व्यक्ती अल्पवयीन मुलीसह खरेदीसाठी संबंधित शोरूममध्ये गेले होते. १६ वर्षीय मुलगी विविध प्रोडक्ट्स पाहत असताना गजाननने तिला वाईट स्पर्श करून लज्जास्पद वर्तन केले. भर शोरूममध्ये त्याने हा प्रकार केल्याने मुलगी घाबरली व तिने कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. तिच्या कुटुंबियांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करत गजाननला अटक केली आहे.