नागपूर : रस्त्यांवरील बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने सज्ज केलेले अत्याधुनिक ‘रडार इंटरसॅप्टर’ अखेर नागपूरच्या रस्त्यांवर उतरले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तांत्रिक कारणामुळे आरटीओ कार्यालयात उभी असलेली ही वाहने आता पूर्ण क्षमतेने कर्तव्यावर हजर झाली असून, पहिल्या ७ दिवसांतच तब्बल ९२८ बेशिस्त वाहनचालकांना दणका दिला आहे.
राज्यातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी परिवहन विभागाने ६९ रडार इंटरसॅप्टर वाहने खरेदी केली आहेत. यात नागपूर ग्रामीण आरटीओला २, शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रत्येकी १ वाहन मिळाले आहे. ही वाहने आॅगस्ट २०२५ मध्ये या तिन्ही कार्यालयात दाखल झाली होती. मात्र प्रशिक्षण आणि तांत्रिक अडचणींमुळे ती कार्यालयातच उभी होती. आता सर्व अडथळे दूर करून ही 'स्मार्ट' वाहने रस्त्यावर उतरली आहेत.
काय आहे या वाहनाची ताकद?
या ‘इंटरसॅप्टर रडार’ वाहनांमध्ये लेझर गन आणि अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे 'रुलब्रेकर्स'ची झोप उडणार आहे. नियम मोडणाºया वाहनचालकाला आता आरटीओ कर्मचारी थांबवणार नाहीत. वाहनातील कॅमेरे आपोआप नियम उल्लंघन करणाºयाचा फोटो काढतील आणि थेट मोबाइलवर 'ई-चलन' पाठवले जाईल.
ओव्हरस्पीडिंगवर वॉच
लांब अंतरावरूनच वाहनाचा वेग मोजण्याची क्षमता या वाहनात आहे. या शिवाय, ‘इंटरसॅप्टर रडार’ वाहनाच्या सुमारे एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट, झिझॅग ड्रायव्हिंग, सिग्नल जंपिंग आणि झेब्रा क्रॉसिंगचे नियम मोडणाºयांवर ही यंत्रणा चोवीस तास लक्ष ठेवणार आहे.
सर्वाधिक कारवाई विना हेल्मेटवर
कारवाई सुरू झाल्याच्या पहिल्या ७ दिवसांत ९२८ ई-चलान जारी करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक कारवाया ओव्हरस्पीड आणि विना हेल्मेट वाहन चालवणाºयांवर झाल्या आहेत. विशेषत: महामार्गांवर वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाºयांना आरटीओच्या या हायटेक वाहनांनी टार्गेट केले आहे.
रस्ता सुरक्षेचे पालन करा
"ही अत्याधुनिक वाहने म्हणजे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक कारवाई करणे आता शक्य झाले आहे. वाहनचालकांनी ई-चलन टाळण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करावे."-किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर
Web Summary : Nagpur deploys advanced 'Radar Interceptor' vehicles to tackle reckless driving and accidents. Equipped with laser guns and cameras, these vehicles automatically detect violations, issue e-challans, and monitor speeding and other traffic offenses. Within seven days, 928 e-challans were issued, primarily for speeding and not wearing helmets.
Web Summary : नागपुर ने लापरवाह ड्राइविंग और दुर्घटनाओं से निपटने के लिए उन्नत 'रडार इंटरसेप्टर' वाहन तैनात किए। लेजर गन और कैमरों से लैस, ये वाहन स्वचालित रूप से उल्लंघन का पता लगाते हैं, ई-चालान जारी करते हैं, और गति और अन्य यातायात अपराधों की निगरानी करते हैं। सात दिनों के भीतर, 928 ई-चालान जारी किए गए, मुख्य रूप से गति और हेलमेट न पहनने के लिए।