रुप शहाला दिलेल्या संरक्षणामुळे दिशा सालियानच्या चौकशीत मदत होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 20:31 IST2022-12-29T20:27:37+5:302022-12-29T20:31:44+5:30

Nagpur News सिने अभिनेते सुशांतसिंग राजपूतच्या खुनाचा मुख्य साक्षीदार रुप शहा याला राज्य सरकारने संरक्षण दिल्यामुळे दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद मिळू शकते, असे मत आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

The protection given to Roop Shah will help in the investigation of Disha Salian | रुप शहाला दिलेल्या संरक्षणामुळे दिशा सालियानच्या चौकशीत मदत होणार 

रुप शहाला दिलेल्या संरक्षणामुळे दिशा सालियानच्या चौकशीत मदत होणार 

नागपूर : सिने अभिनेते सुशांतसिंग राजपूतच्या खुनाचा मुख्य साक्षीदार रुप शहा याला राज्य सरकारने संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद मिळू शकते, असे मत आमदार नितेश राणे यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मनसुख हिरेन, दिशा सालियान यांच्या खुनाच्या संदर्भात सुशांतसिंग राजपूतला माहिती होती. तो ही माहिती उघड करणार होता. त्यामुळे त्याचाही खून करण्यात आला, असा आरोप राणे यांनी केला. रुप शहा याला यासंदर्भात माहिती होते. त्यामुळे रुप शहाच्या जिवालाही धोका होता. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका युवा मंत्र्याचेही नाव पुढे येऊ शकते, असेही संकेत नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Web Title: The protection given to Roop Shah will help in the investigation of Disha Salian