शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांच्या काळातील ६ कोटींचा थकीत पाणीपट्टी कर नातवंडांच्या डोक्यावर ! १९७२ पासून आजपर्यंत शेतकऱ्यांवर थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:25 IST

Bhandara : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशय संचालित करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे सिहोरा परिसरातील करारबद्ध शेतकऱ्यांवर पाणीपट्टी करापोटी ६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशय संचालित करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे सिहोरा परिसरातील करारबद्ध शेतकऱ्यांवर पाणीपट्टी करापोटी ६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरली गेल्याने व वाढतच असल्याने आता आजोबांचे थकीत कर्ज नातवंडाना फेडावे लागणार आहे. पाणीपट्टी थकीत कर वसुलीसंदर्भात राज्य सरकारने अद्याप सकारात्मक निर्णय घेतला नाही, हे विशेष !

मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशय ब्रिटिशकालीन असल्याने संचालन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी सिहोरा गावात पाटबंधारे विभागाचे कार्यालय स्थापन करण्यात आले. डावा आणि उजवा कालवा असे दोन विभाग निर्माण करण्यात आले. या दोन्ही विभागांना स्वतंत्र शाखा अभियंता आणि २५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या विभागांना प्रत्येकी ६ हजार हेक्टर आर शेतीचे क्षेत्र देण्यात आले. शेतकऱ्यांना शेती सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. अल्प दरात फक्त खरीप हंगामात पाणी वाटप सुरू करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी पाणीपट्टी कराची फेड करताना अपेक्षित सहकार्य केले नाही.

परिणामतः सन १९७२ पासून डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांकडे सन २०२१ पर्यंत ६ कोटी रुपयांची पाणीपट्टी कराची थकबाकी शिल्लक आहे. यात डावा कालव्याची २ कोटी आणि उजवा कालव्याची ४ कोटीची पाणीपट्टी कराची थकबाकी आहे. १० हजार शेतकरी पाणीपट्टी थकबाकी कराच्या ओझ्यात आहेत. आजोबाने शेती करारबद्ध केली असली तरी त्यांच्या निधनानंतर नातवंडाना ही थकीत पाणी पट्टी भरावी लागणार आहे.

थकीत पाणीपट्टी कर वसुलीत ग्रामपंचायत पॅटर्न राबवा

सन २०२१ नंतरही चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप सुरू आहे. पाणी वापर संस्था वसुली करीत असल्या तरी जुन्या पाणीपट्टी कराची वसुली थकीतच आहे. यामुळे पाटबंधारे विभागाची कसरत होत आहे. विभागाकडे वसुलीसाठी मनुष्यबळ नसल्याने थकबाकी वाढतच आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या धर्तीवर थकबाकी वसुलीत सूट देणारा पॅटर्न राबविण्याची मागणी होत आहे.

यामुळे वाढली थकबाकी

पाणीपट्टी कराची वसुली पाटबंधारे विभागाचे कर्मचारी करायचे. परंतु हे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर नवीन कर्मचारी रिक्त जागेवर आले नाहीत. शासन स्तरावरून विकास कामे होत असल्याने तत्कालीन कर्मचाऱ्यांनी वसुली मनावर घेतली नाही. शेतकऱ्यांनीही स्वतःहून थकबाकी भरण्यात स्वारस्य दाखिवले नाही.

"शेतकऱ्यांकडे चांदपूर जलाशयाची पाणीपट्टी कराची थकबाकी आहे. यामुळे कालवे आणि नहरांची देखभाल व दुरुस्ती करताना अडचणी येत आहेत. धान पिकांना अल्प दरात पाणी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी कराचे वसुलीत सहकार्य करावे."- आशिष ढोके, उपविभागीय अभियंता

English
हिंदी सारांश
Web Title : Grandchildren burdened with grandfather's ₹6 crore unpaid water tax!

Web Summary : Chandpur dam farmers owe ₹6 crore in water tax since 1972. Grandchildren now face this debt. The government hasn't decided on waivers. Low collection hinders canal maintenance.
टॅग्स :Farmerशेतकरी