लोकमत न्यूज नेटवर्कबेलोना : अल्पवयीन विद्यार्थिनीने तिच्या घरातील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलोना येथे गुरुवारी (दि. ५) सायंकाळी घडली.
जयश्री प्रभाकर सातपुते (१७, रा. बेलोना, ता. नरखेड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नरखेड शहरातील नाडेकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत विज्ञान शाखेत शिकायची. बेलोना येथे गुरुवारी आठवडी बाजार भरत असल्याने तिची आई भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. घरी कुणीही नसल्याचे पाहून तिने घराच्या दाराला बाहेरून लावून ते बंद केले. त्यानंतरत खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतला.
आई बाजारातून घरी परत आल्यावर तिला दाराला कुलूप दिसल्याने तिचे जयश्रीच्या मोबाइल फोनवर संपर्क केला. फोन सतत बंद येत असल्याने तिच्या काकाला फोन करून माहिती दिली. काकाने सुरुवातीला घराच्या परिसरात तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने घरात डोकावून बघितले तेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. काकाने दार तोडून तिला खाली उतरविले आणि नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Web Summary : A 17-year-old girl in Belona, Narkhed, tragically ended her life by hanging herself. Her mother found her after returning from the market. The cause of suicide is unknown, and police are investigating.
Web Summary : नरखेड़ के बेलोना में 17 वर्षीय लड़की ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। बाजार से लौटने पर माँ को वह लटकी हुई मिली। आत्महत्या का कारण अज्ञात है, पुलिस जांच कर रही है।