शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार?' आमदार जयंत पाटील यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:45 IST

Nagpur : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती. परंतु, महापालिकेचे कर्मचारी श्वानांना पकडू शकले नाही.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळ परिसरात सरकारवर खोचक टीका करीत 'जे सरकार कुत्री पकडू शकत नाही, ते बिबट्या काय पकडणार'.

एक कोटी शेळ्या आणणार कुठून ?: म्हात्रे

बिबट पकडण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी एक कोटी शेळ्या जंगलात सोडण्याची घोषणा केली आहे, पण बिबट्यांसाठी एक कोटी शेळ्या आणणार कुठून, असा सवाल भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. शेळ्या सोडणे हा तात्पुरता उपाय आहे. मुळात बिबट्याचे वनातील खाद्य साखळी वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या : रवी राणा

बिबट्यावरील उपाय म्हणून बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यात यावा व तसा प्रस्ताव केंद्रीय वनमंत्र्यांकडे पाठविण्यात यावा, असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास मी स्वतः दोन बिबटे पाळणार आहे, असे राणा म्हणाले. अंबानींनी सुरू केलेल्या वनतारासारखे प्राणिसंग्रहालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, त्यासाठी उद्योगपतींनी पुढे यावे व सरकारने त्यांना परवानगी द्यावी, जेणेकरून मानव-वन्यप्राणी संघर्षावर तोडगा निघेल, असेही रवी राणा म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Government can't catch dogs, how will they catch leopards?

Web Summary : Amidst leopard attacks, concerns rise over stray dogs. Jayant Patil criticized the government's inability to control animals. Legislators proposed diverse solutions, from releasing goats to domesticating leopards, to mitigate human-wildlife conflict.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनGovernmentसरकारnagpurनागपूरleopardबिबट्याRavi Ranaरवी राणाGanesh Naikगणेश नाईकforest departmentवनविभाग