शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 19:46 IST

Nagpur : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता. या आधारावर उद्योग व विकासाचे धोरण राबविल्यास खऱ्या अर्थाने परिवर्तन दिसून येईल. परंतु तसे झाले नाही. नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशाच चुकली आहे, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी नागपुरात आले असता त्यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. लोकमत टाईम्सचे संपादक एन.के. नायक व लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांचेसोबत यावेळी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या ज्याची गरज आहे, ते होताना दिसत नाही आणि ज्याची गरज नाही, त्याकडे धावले जात आहे. काॅटन व संत्रा ही आपली ओळख आहे. काॅटन व संत्रा सिटी म्हणून विकास करता येऊ शकतो. सरकार मेकींग इंडियावर भर देत आहे. परंतु मेक इन इंडिया ऐवजी मेड इन इंडियावरवर भर देण्याची गरज आहे. कारण मेड इन इंडिया हा विचार संशोधनाला प्रोत्साहित करणारा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देश विदेशातील राजकारणासह प्रदूषण, पर्यावरण, धर्म, समाजकारण या विषयावर मनमोकळी चर्चा केली. 

नागपुरात विमानांचे मेंटनन्स सेंटर ही जागतिक मागणी

नागपूरच्या आकाशावरून साडेसातशेवर फ्लाईट जातात. येथे विमानांचे इमरजेंसी मेंटनन्स सेंटर व्हावे, अशी जगभरातून मागणी आहे. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. येथे इंटरनॅशन इमरजेंसी सेंटर तयार झाले तर एकट्या मनपाचा अर्थसंकल्प हा ४२ हजार कोटींवर जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha's development, including Nagpur, has lost direction: Prakash Ambedkar

Web Summary : Prakash Ambedkar believes Nagpur and Vidarbha's development strategy is misguided. He advocates leveraging Nagpur's strengths, like cotton and oranges, for industry. He also proposes an aircraft maintenance center for massive revenue and job creation.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूरVidarbhaविदर्भ