शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सध्याचे वातावरण प्रचंड दहशतवादी - श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:14 IST

नागपूर : वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, ...

नागपूर: वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे केले. 

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनात रविवारी अध्यक्षस्थानाहून सबनीस बोलत हाेते. संमेलनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष हेमंत काळमेघ, साहित्यिक डॉ. शोभा रोकडे, मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, प्राचार्य डॉ. जे.डी. वडते आदी उपस्थित होते. 

सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. जगात बायडेन, पुतीन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र, शेक्सपिअर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नाहीत, ते साऱ्या जगाचे नायक आहेत. तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी कधीही पडेल. वैज्ञानिक हे प्रतिभावंत आहेत. मात्र, ते नव्या हिटलरच्या हातात जीवघेणी हत्यारे सोपवित आहेत. ते माणुसकीचे मारेकरी झाले असल्याचे डॉ. सबनीस म्हणाले. 

याप्रसंगी कादंबरीकार शेषराव शंकरराव खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विजया मारोतकर, चरणदास वैरागडे, आनंदी चौधरी, मंगेश बावसे, अरुणा कडू, पल्लवी उमरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

‘घरात पुस्तकांची श्रीमंती असावी’ -आपल्या घरात पैशांची श्रीमंती नसेल तरी चालेल. मात्र, पुस्तकांची श्रीमंती असावी. महिलांनी साड्यांचे, चपलांचे कपाट खूप तयार केले. मात्र, त्यात पुस्तकांचेही कपाट असावे, असे आवाहन डॉ. शोभा रोकडे यांनी यावेळी केले.

साहित्य संमेलने कंटाळवाणी - देशमुखसाहित्य संमेलने ही कंटाळवाणे होत असतील तर त्यात आम्ही कशाला यावे, असा प्रश्न पडतो आहे. याचा विचार आयोजकांनी करणे अपेक्षित असून, वर्तमानात इंग्रजी ही ज्ञानाची व व्यवहाराची भाषा असली तरी मायमराठी विसरून चालणार नाही, अशी भावना माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसIndiaभारतnagpurनागपूर