शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Ativrushti Nuksan Bharpai : पीक गेलं, घर गेलं अजून काय पाहायचं उरलं.. शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण अजून पाहणी संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:02 IST

Nagpur : सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने २९ हजार ९७१ हेक्टरमधील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या डोळ्यांत अश्रू आहे. शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी टाहो फोडत आहे. 

शासन पातळीवर अद्याप सर्वेचे काम सुरू आहे. पदाधिकारी, मंत्री यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत. परंतु, मदत कधी व किती मिळणार असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. संत्रा व मोसंबी पिकाला काही भागात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आंबियाचा संत्रा खाली पडला आहे. आस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सावनेर तालुक्यात केळवद सर्कल मधील सालई, नांदागोमुख, उमरी (भ) आणि छत्रापूर या चार गावांत सर्वाधिक नुकसान झाले. काटोल तालुक्यातील सोनोली नंदारीटी, पार्टी रीठी, तपणी, वाई, चंदकापूर, माळेगाव, झिल्पा येनवा, सावळी, बोरगाव रिठी, राऊळगाव आणि डोंगरगाव या भागांतील संत्रा मोसंबीच्या झाडांवरील फळे गळून पडत आहेत. सोबतच सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

जुलै महिन्यात जिल्ह्यातील ६ हजार १२८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नसतानाच सप्टेंबरमध्ये २९ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाला येलो मोडॉकचा फटका बसला आहे.

काही दिवसांत घरात येणारे पीक बुडाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार मात्र जिल्ह्यात ३ हजार १७४ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले असून, यामुळे ४ हजार शेतकरी बाधित झाले आहे. वास्तविक नुकसानीचा आकडा आता अतिवृष्टीमुळे त्याच लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त होत आहे, तो सावरण्यासाठी सरकारने तत्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संत्र्याला एक लाख तर सोयाबीनला ५० हजार द्या

संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, म्हणून शासनाने हेक्टरी एक लाख तर सोयाबीनला हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तरच, शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी आनंदात जाईल.

५० हजार हेक्टर पिकाचे नुकसान

जिल्ह्यात २९ हजार ९७१ हेक्टरमधील सोयाबीन, ११ हजार १७२ हेक्टर संत्रा व ८ हजार ७९२ हेक्टरवरील मोसंबी फळबागांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे कपाशीचे किती नुकसान 3 झाले याची माहिती गोळा केली जात आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे सुरू आहे. मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून, अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

पावसामुळे बाधित सोयाबीन क्षेत्रएकूण क्षेत्र - ७८,६००बाधित क्षेत्र - २९,९७१बाधित गावे - ९४६बाधित शेतकरी - ४३,३९७

"लाडक्या बहिणींना मदत केली. सोयाबीन हातून गेलाच पराटीची पानगळ सुरू आहे. संत्र्याचा दहा टन माल शेतात होता, हा तरी यंदाच्या वर्षी साथ देईल, अशा अपेक्षेने होतो. मात्र, सततच्या पावसाने तीन टनवर माल दिसत नाही. किमान शासनाकडून संत्रा-मोसंबीची तरी नुकसानभरपाई अपेक्षित आहे."- रोशन झळके

"झाडावरच फळे गळून पडत असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल."- चंद्रकांत महाजन, माजी सरपंच, सोनोली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Devastate Crops, Farmers Await Aid in Nagpur District

Web Summary : Nagpur farmers face ruin due to heavy rains and crop diseases. Soybeans, oranges, and cotton are severely affected. Farmers urgently need government aid as surveys continue and losses mount, with many awaiting compensation.
टॅग्स :CropपीकFarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर