शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान

By योगेश पांडे | Updated: November 15, 2024 05:52 IST

खोपडे-पेठे लढतीत पांडे, हजारेंच्या उमेदवारीच्या तिरंगी-चौरंगी छटा.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील तीन निवडणुकींपासून भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे तळागाळात प्रचारावर भर देत आहेत. मात्र या दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर महायुतीमहाविकास आघाडीतील बंडखोरांचे आव्हान आहे. बंडखोरांच्या मतांच्या आधारेच येथील निकालाचे समीकरण ठरेल, असे चित्र आहे.

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला खोपडे यांनी २००९ साली सुरुंग लावला व त्यानंतर त्यांनी येथून हॅट्ट्रिक लगावली. यावेळी भाजपमधून नवीन चेहरा देण्यात यावा, अशी अनेकांची मागणी होती. मात्र पक्षाने खोपडे यांनाच परत संधी दिली. दुसरीकडे हा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावा यासाठी खूप प्रयत्न झाले. मात्र अखेरच्या क्षणी येथून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना तिकीट मिळाले. यामुळे नाराज झालेले गेल्यावेळचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष आव्हान दिले, तर अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी खोपडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. त्यांनी प्रचाराचे रान पेटविले आहे.

या मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक पट्ट्यांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पुरुषोत्तम हजारे यांचा या मतदारसंघात चांगला ‘कनेक्ट’ आहे. कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यांच्या संपर्कात आहेत, तर दुसरीकडे आभा पांडे मागील महिन्याभरापासून प्रचाराला लागल्या असून, त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. खोपडे यांच्याविरोधात अनेक ठिकाणी ॲंटी इन्कबन्सी असल्याचा दावा इतर उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

२०१४ व २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वांत जास्त मताधिक्य पूर्व नागपुरातून मिळाले. २०२४ मध्येदेखील गडकरी यांना येथूनच सर्वात जास्त ७३ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता कृष्णा खोपडे यांच्यासमोर तो प्रभाव टिकविण्याचे आव्हान आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प प्रचाराच्या केंद्रस्थानीपूर्व मतदारसंघात विविध आर्थिक स्तराचे मतदार असून, जातीय समीकरणांमध्येही वैविध्य आहे. स्मार्ट सिटीचा मतदारसंघ अशी ओळख असली तरी पूर्व नागपुरात मूलभूत समस्या कायम आहेत. विरोधकांकडून या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, असुविधांची बजबजपुरी, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, स्मार्टसिटीच्या आड स्थानिकांची पिळवणूक, तेथील भूमाफिया, खंडणीचे प्रकार इत्यादी मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. खोपडे यांच्या प्रचाराचा भर मतदारसंघातील विकासकामे व विविध योजनांचा झोपडपट्टीतील लोकांना दिलेला लाभ यावर आहे.

मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार?या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी व बसपानेदेखील उमेदवार दिले आहेत. बसपाला लोकसभेत फारशी कमाल दाखविता आलेली नसली तरी अनेक वस्त्यांमध्ये कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पांडे, हजारे यांच्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील मतांचे काही प्रमाणात विभाजन निश्चितपणे होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

विधानसभा २०१९कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) : १,०३,९९२पुरुषोत्तम हजारे : कॉंग्रेस : ७९,९७५सागर लोखंडे : बसप : ५,२८४मंगलमुर्ती सोनकुसरे : वंचित बहुजन आघाडी : ४,३३८नोटा : ३,४६०

विधानसभा २०१४कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) : ९९,१३६अभिजित वंजारी : कॉंग्रेस : ५०,५२२दिलीप रंगारी : बसप : १२,१६४दुनेश्वर पेठे : राष्ट्रवादी : ८,०६१अजय दलाल : शिवसेना : ७,४८१

लोकसभेतील मते (२०२४)नितीन गडकरी : महायुती : १,४१,३१३विकास ठाकरे : महाविकास आघाडी : ६७,९४२योगेश लांजेवार : बसप : २,९७८

एकूण उमेदवार : १७एकूण मतदार : ४,१८,९८१पुरुष मतदार : २,१०,५६२महिला मतदार : २,०८,३८६तृतीयपंथी : ३२

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी