मुलीकडे गेलेल्या महिलेचे रोख, दागिने पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: June 21, 2023 14:21 IST2023-06-21T14:19:38+5:302023-06-21T14:21:54+5:30
वाठोडा पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीकडे गेलेल्या महिलेचे रोख, दागिने पळविले
नागपूर : घराला कुलुप लाऊन जबलपूरला मुलीकडे गेलेल्या महिलेच्या घरातील रोख व दागिने असा एकुण ४७ हजाराचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटन वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी १५ जूनला दुपारी १२ वाजता ते सोमवारी १९ जूनला दुपारी २.३० वाजेदरम्यान घडली.
कांताबाई रोशनलाल पटले (वय ६३, रा. राखुंडेनगर, खरबी पॉवर हाऊसजवळ, वाठोडा) या आपल्या घराला कुलुप लाऊन मुलीकडे जबलपूरला गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लाकडी आलमारीतून १५ हजार रुपये व लोखंडी आलमारीतून १५ हजार रुपये तसेच चांदीचे दागिने असा एकुण ४७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. कांताबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.