कटऑफचा फटका; दहावीत ८५-९० टक्के गुण घेतले तरीही अद्याप अकरावीत प्रवेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:55 IST2025-07-24T16:54:51+5:302025-07-24T16:55:26+5:30
Nagpur : अकरावी प्रवेशात गोंधळ कायम; विज्ञान शाखेतील विद्यार्थी चिंतित

The blow of the cutoff; Despite scoring 85-90 percent in 10th, there is still no admission in 11th
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून दुसऱ्या फेरीत जेमतेम ९६५५ प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थी संख्या कमी आणि जागा भरपूर असूनही दोन फेऱ्याअंती केवळ ३२ हजार प्रवेश झाले असून हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात तिन्ही शाखेच्या २०० च्या जवळपास ९८,७९५ महाविद्यालयात जागांसाठी यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेश होत आहेत. यासाठी ४२ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशाची पहिली फेरी ३० जूनपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत २२,५७४ प्रवेश निश्चित झाले. पुढे रखडलेल्या प्रक्रियेनंतर १८ जुलैपासून दुसरी फेरी सुरू झाली. दुसऱ्या फेरीसाठी २२०४० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते.
जागा असून प्रवेश का रखडले?
- ५० टक्के जागा रिक्त राहणार असूनही दोन फेन्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही रखडलेले आहेत.
- विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ 3 इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातून ६०, ७० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे समोर येते.
- मात्र, ८५ ते ९० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. कटऑफ अधिक लागल्याने प्रवेश थांबल्याचे सांगितले जाते आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या महाविद्यालयात त्यांचे प्रवेश झाले नाहीत. या ना त्या कारणाने प्रवेशाचा खोळंबा होत आहे.
बार्टीच्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार
अनुसूचित जाती/जमातीच्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकलच्या अभ्यासासाठी बार्टीकडून शिष्यवृत्त देण्यात येते.
यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश झालेल्या महाविद्यालयाचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झालेले नसल्याने त्यांना महाविद्यालयाचे बोनाफाइड मिळाले नाही. त्यामुळे बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून मुकावे लागणार, ही भीती विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.