जन्मदाता बापच निघाला नराधम; अल्पवयीन मुलीवर दोन वेळा केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 22:34 IST2022-08-04T22:33:49+5:302022-08-04T22:34:23+5:30
Nagpur News हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. १२ वर्षीवर मुलीवर जन्मदात्या बापाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जन्मदाता बापच निघाला नराधम; अल्पवयीन मुलीवर दोन वेळा केला अत्याचार
नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. १२ वर्षीवर मुलीवर जन्मदात्या बापाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भांदवि कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ४, ६, १० व ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलगी ३ ऑगस्ट रोजी शाळेत गेली असता दुपारी एक वाजताच्या सुमारास तिला आरोपीने घरी आणले. त्यावेळी तिची आई मजुरीच्या कामासाठी शेतात गेली होती. दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
यापूर्वीही त्याने २७ जुलैच्या मध्यरात्री सर्व झोपले असता मुलीचे तोंड दाबून अत्याचार केला. त्यावेळीही त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकारामुळे मुलगी पूर्णपणे हादरली होती. तिने कामावरून आलेल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने प्रसंगावधान साधत तिला नातेवाइकांकडे नेले. नातेवाइकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिने गुरुवारी (दि. ४) मुलीसह हिंगणा पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांधे व पांडुरंग जाधव तपास करीत आहे.