ठाकरे जिल्हाधिकारी, मुदगल अतिरिक्त विभागीय आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:08 IST2019-09-27T21:07:02+5:302019-09-27T21:08:31+5:30
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांची नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाकरे जिल्हाधिकारी, मुदगल अतिरिक्त विभागीय आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांची नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. रवींद्र ठाकरे यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.