शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:09 PM

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाशी सल्लामसलत करण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे निर्मला सीतारामन यांनी घेतली आरएसएसचे सरकार्यवाह भय्याजी जोशींची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाशी सल्लामसलत करण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.निर्मला सीतारामन यांनी रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते. त्यानंतर सीतारामन यांनी भय्याजी जोशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या भेटीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. मात्र, पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागministerमंत्री