शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा सरकारवर रिमोट नाही

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी ..

पत्रपरिषद : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा युक्तिवाद

नागपूर : लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत संघाची महत्त्वाची भूमिका होती. देशातील लोकांनाही परिवर्तन हवे होते. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ३0-३५ वर्षांंनंतर केंद्रात स्थिर सरकार येत आहे. नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रि या आहे. यात सरकार, प्रशासन, नागरिक व राजकीय पक्ष या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवीन सरकार ठोस पावले उचलतील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली. भारतातील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संघाने केले होते. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शांततेच्या वातावरणात ही प्रक्रि या पार पडली. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ही एक सामान्य प्रक्रि या असते. त्यामुळे मनातील कटुता विसरून राजकीय नेत्यांनी सकारात्मक विचारांनी या निवडणुका घ्याव्या, असे आवाहन जोशी यांनी केले. जात, धर्माच्या आधारावर निर्णय न घेता, देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून सरकार निर्णय घेईल. शोषणमुक्त व सक्षम समाज निर्माण करण्यात सरकारला यश येईल, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला संघाचे महानगर संघटक दिलीप गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)