शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेची मुलीसह आत्महत्या, विष प्राशन करून संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 11:43 IST

बुटीबाेरीतील घटना

बुटीबाेरी (नागपूर) : शिक्षिका असलेल्या आईने मुलीसह कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुटीबाेरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ७, ओम साईनगर येथे रविवारी (दि. २१) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

चेतना शिरीष भक्ते (वय ३५) व हर्षिका ऊर्फ छवी शिरीष भक्ते (११) असे मृत मायलेकीचे नाव आहे. मृत चेतना ही पतीसाेबत पटत नसल्याने वडिलांच्या घरी मुलीसाेबत वास्तव्यास हाेती. उदरनिर्वाह करण्यासाठी ती परिसरातील खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत हाेती. शनिवारी रात्री जेवण करून ती झाेपायला आपल्या खाेलीत गेली हाेती. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजल्यानंतरही मुलगी व नात उठली नसल्याने तिचे वडील दिनेश गुरवे त्यांना उठविण्यासाठी गेले हाेते. मात्र, खाेलीचे दार ठाेठावूनही आतून काेणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी बाजूच्या भाडेकरूच्या खाेलीतून मुलीच्या खाेलीत जाऊन पाहिले असता, मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच त्यांनी आरडाओरडा करून मुलाला व शेजाऱ्यांना बाेलावले.

घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृत चेतनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच मुलगी छवीची प्रकृती अत्यावस्थ असल्याने तिला लगेच बुटीबाेरी येथील खासगी दवाखान्यात नेले असता, डाॅक्टरांनी तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात पाठविले. तिथे उपचारादरम्यान छवीचा मृत्यू झाला. मायलेकींनी आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर