शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी अधिकार्‍यांची किरकिर

By admin | Updated: May 23, 2014 01:00 IST

नागरिकांना मालमत्तेवर कर लावून घेता यावा, महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी या उद्देशाने स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सुरू केलेल्या शिबिराला कर विभागातील अधिकारी

बाल्या बोरकर यांनी बजावले : शिबिराला कर्मचारी येतात उशिरा

नागपूर : नागरिकांना मालमत्तेवर कर लावून घेता यावा, महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी या उद्देशाने स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सुरू केलेल्या शिबिराला कर विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनीच सुरुंग लावला आहे. शिबिर सकाळी ८ वाजता सुरू होत असताना कर्मचारी मात्र १० वाजता येत आहेत. अधिकार्‍यांनीही शिबिर गांभीर्याने घेतलेले नाही. नागरिकांना पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही, अशी निरीक्षणे नोंदवित बोरकर यांनी या एकूणच कारभारावर नाराजी व्यक्त केली. बोरकर यांच्या निर्देशानुसार तीन दिवसीय कर आकारणी व नामांतरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आज शिबिराचा दुसरा दिवस होता. दहाही झोनमध्ये पहिल्या दिवशी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आज दुसर्‍या दिवशी ३६ लाख ५८ हजार रुपयांची कर वसुली झाली. नामांतरणाची प्रकरणे निकाली काढल्याने १ लाख २० हजार रुपये मिळाले. धरमपेठ, धंतोली, गांधीबाग परिसरात मोठ्या वसुलीची अपेक्षा फोल ठरली. शिबिराचीे वेळ सकाळी ८ वाजतापासून आहे. मात्र, या झोनमधील कर्मचारी १० वाजता शिबिरात येत आहेत. लकडगंज झोनमध्य आपण पुढाकार घेतल्याने २७६ अर्जापैकी ६५ अर्ज निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराच्या जनजागृतीसाठी पत्रके वितरित करणे, आॅटो फिरवून भोंग्याने लोकापर्यंत शिबिराचे माहिती पोहोचवण्यातही कर्मचारी अपयशी ठरले. शिबिर अंतर्गत वस्त्यांमध्ये लावणे अपेक्षित असताना अनेक कर्मचार्‍यांनी स्वत:च्या सोयीसाठी मुख्य रस्त्यांवर शिबिर लावले. त्यामुळे नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, सतरंजीपुरा या झोनमध्ये कर आकारणीसाठी आलेल्या अर्जावर कर्मचार्‍यांनी कुठलीही कारवाई केली नाही. याची गंभीर दखल घेतली जाईल,असा इशारा त्यांनी दिला. शिबिराचा कालावधी आणखी दोन दिवस वाढविण्याचे संकेत त्यांनी दिले. गेल्या दोन दिवसांत शिबिरामुळे महापालिकेच्या उत्पन्नात ४६ लाख ६५ हजार रुपयांची भर पडली आहे. (प्रतिनिधी)