खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवरही कठोर कारवाई करा; ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:14 IST2026-04-03T13:13:31+5:302026-04-03T13:14:37+5:30
Nagpur : नागपूरमधील तथाकथित भोंदूबाबा खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता साहित्यिक स्तरातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Take strict action against women who voluntarily go to Kharat; Senior writer Aruna Sabane demands from the Chief Minister
नागपूर : नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता साहित्यिक स्तरातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध लेखिका आणि साहित्यिक अरुणा सबाने यांनी याप्रकरणी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक खळबळजनक मागणी केली आहे.
स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाईची मागणी
अरुणा सबाने यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, केवळ भोंदूबाबा खरातवर कारवाई करून चालणार नाही, तर ज्या महिला स्वतःच्या मर्जीने (स्वेच्छेने) त्याच्याकडे गेल्या होत्या, त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या महिलांमुळेच अशा भोंदूगिरीला समाजात खतपाणी मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांपासून सुरुवात व्हावी
सबाने यांनी पत्राद्वारे अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. "या प्रकरणातील कारवाईची सुरुवात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि ज्या उच्चशिक्षित महिला या कृत्यात सामील होत्या, त्यांच्यापासून झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजात वावरणाऱ्या जबाबदार आणि शिक्षित महिलांनी अशा प्रवृत्तींना बळी पडणे किंवा प्रोत्साहन देणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
काय आहे खरात प्रकरण?
नाशिकमधील भोंदूबाबा खरात याने देवाचा अवतार असल्याचे सांगून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. या प्रकरणात आता शिक्षित वर्गातील महिलांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाल्याने सबाने यांनी ही मागणी उचलून धरली आहे.
या मागणीमुळे आता हे प्रकरण केवळ एका भोंदूबाबापुरते मर्यादित न राहता, त्याला साथ देणाऱ्या 'भक्तां'भोवतीही कायद्याचा फास आवळला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.