शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, विद्यासागरजी महाराज यांचे राष्ट्रपतींना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 9:54 PM

कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले.

नागपूर, दि. २२ - कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले. विद्यासागरजी महाराज हे आपल्या मुनिसंघासोबत अतिशय श्रीक्षेत्र रामटेक येथील या जैन मंदिर परिसरात चातुर्मास करत आहेत.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या दीक्षा घेण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयम स्वर्ण महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. सकाळी ११.५० च्या सुमारास राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी राष्ट्रपतींसोबतच राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रपती व सर्व मान्यवरांनी आचार्यश्रींना नमन केले व श्रीफळ अर्पण केले. यानंतर राष्ट्रपतींनी शांतिनाथ जैन मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खासगी कक्षात जैन समाजाचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला. इसवी सन सुरू होण्याच्या अगोदरपासून देशाला भारत हे नाव आहे. ह्यइंडियाह्ण व ह्यभारतह्ण या दोन्ही नावांतून वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. भारत स्वदेशी भावनेशी जुळला आहे. त्यामुळे देशाच्या नीतीनिर्मात्यांनी भारत याच नावाचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. भारतीयत्वाची ओळख अर्थात आपल्या संस्कृती व सभ्यतेची ओळख देशाच्या प्रत्येक नागरिकाला व जगाला व्हावी, यासाठी धोरण ठरावे, अशी अपेक्षादेखील आचार्यश्रींनी यावेळी व्यक्त केली. स्त्री शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, प्रसार आणि खादीचा पुरस्कार करून स्वदेशीला चालना द्यावी,अशा भावना विद्यासागरजी महाराज यांनी राष्ट्रपतींजवळ व्यक्त केल्या. यावेळी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या द्वारे रचलेले महाकाव्य ह्यमूकमाटीह्णच्या उर्दू आवृत्तीचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी राष्ट्रपती महोदयांना मंदिरात हातमागावर तयार करण्यात आलेला कोट आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर जैन मुनि, भाविक व नागरिक उपस्थित होते.न्यायव्यवस्थेचे काम हिंदीत व्हावेयावेळी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांनी विविध देशांचे उदाहरण देत मातृभाषेसंदर्भात आपल्या भावना राष्ट्रपतींसमोर मांडल्या. मातृभाषेपासून नवीन पिढी दुरावते आहे. त्यासाठीच मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. सोबतच अनेकांना इंग्रजीत व्यवहार जमत नाही. न्यायपालिकेचा कारभार मोठा आहे. इंग्रजी न लादता न्याय व्यवस्थादेखील हिंदीमध्ये करायला हवी, असे मत आचार्यश्रींनी व्यक्त केले.कडेकोट सुरक्षा व्यवस्था, भाविकांची अडचणदरम्यान, राष्ट्रपतींच्या दौ-यासाठी रामटेकमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. आचार्यश्री व राष्ट्रपतींची भेट खुल्या मंचावर झाली. हा अविस्मरणीय क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र भाविकांनी भरलेल्या मंडपात प्रशासनाने कुणालाही कॅमेºयाने छायाचित्र काढू दिले नाही. काही जणांवर तर चक्क प्रशासनातील अधिकारी ओरडले.आयोजक ट्रस्टने नेमलेल्या छायाचित्रकारांनादेखील तेथून बाहेर काढण्यात आले. अनेकांचे कॅमेरे हिसकावण्यात आले व मोबाईल फोन जप्त करण्यात आले. राष्ट्रपती व आचार्यश्री यांना अक्षरश: सुरक्षा रक्षकांचा वेढा होता. त्यामुळे सामान्य भाविकांना मंचावरील काहीच दिसत नव्हते. कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा गोपनीय दौरा नव्हता व कार्यक्रमस्थळदेखील संवेदनशील नव्हते. मग सुरक्षेच्या नावावर प्रशासनाने इतकी कठोर भूमिका का घेतली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आचार्यश्रींना भेटून समाधान लाभते : राष्ट्रपतीह्यलोकमतह्ण वृत्तपत्रसमुहाच्या ह्यएडिटोरिअल बोर्डह्णचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी शुक्रवारी राजभवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना भेटून आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. आचार्यश्रींसोबत त्यांची ही दुसरी भेट आहे. १ वर्षाअगोदर भोपाळ येथे त्यांची भेट झाली होती. मागील वर्षी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचा चातुर्मास भोपाळमध्ये झाला होता. यावेळी एका विशेष कार्यक्रमात बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आचार्यश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. ह्यशिक्षण व भारतह्ण या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला संबोधित केले होते. शुक्रवारच्या भेटीमुळे या आठवणींना उजाळा मिळाला.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्ष