शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

रेती माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 8:09 PM

शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांवर प्रतिबंध करणारा कायदा-१९८१) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात एक गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांवर प्रतिबंध करणारा कायदा-१९८१) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. या आदेशामुळे रेती माफियांची नाळ ठेचली जाणार आहे.गेल्या तारखेला न्यायालयाने रेती माफियांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते का अशी विचारणा केली होती. राज्य सरकारने त्यावर उत्तर सादर करून रेती माफियांवर प्रकरणातील तथ्ये व परिस्थिती पाहून मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते असे सांगितले. औरंगाबाद विभागामध्ये एका प्रकरणात मोक्कांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच, नाशिक व औरंगाबाद विभागात एमपीडीए कायद्यांतर्गत प्रत्येकी दोन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. याशिवाय भारतीय दंड विधानांतर्गत नियमित कारवाई केली जात आहे अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने वरील आदेश देऊन प्रकरणावर ११ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने रेती तस्करांच्या बेमुर्वतपणाची व कायद्याचा धाक न बाळगण्याच्या वृत्तीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. कायद्याची तमा न बाळगणे ही रेती माफियांची वृत्ती बनत चालली आहे. त्यातून रेती तस्करांनी महसूल अधिकारी व पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. गेल्या एप्रिलमध्ये रेती तस्करी पकडण्याच्या तयारीत असलेले नायब तहसीलदार सुनील साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांना रेतीच्या ट्रकने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. साळवे व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. नागपुरात नंदनवन, कळमना, हुडकेश्वर व वाडी परिसरात रेती माफियांचे अड्डे आहेत. ते नागपूरसह भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नद्यांमधून रोज लाखो रुपयांची रेती चोरून आणतात. त्या रेतीची नंदनवन, कळमना, हुडकेश्वर व वाडी परिसरात साठवणूक केली जाते. त्यानंतर ग्राहकांना मागणीनुसार रेती विकली जाते. रेती तस्करीमुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.राजकीय नेत्यांचा आशीर्वादरेती तस्करांवर काही राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी शिरून व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट करणे आवश्यक झाले आहे. न्यायालयाने या विषयाची दखल घेतल्यामुळे सरकारकडून प्रभावी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राजकीय नेत्यांचा आशीर्वादरेती तस्करांवर काही राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी शिरून व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट करणे आवश्यक झाले आहे. न्यायालयाने या विषयाची दखल घेतल्यामुळे सरकारकडून प्रभावी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयsandवाळूmafiaमाफियाMCOCA ACTमकोका कायदा